निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा
ज्ञान आणि कौशल्ये संपादन करून अधिक सक्षम व्हावे- ए. तु. कराड
विद्यार्थ्यांनी ध्येय आधारित कृती आराखडा तयार करावा- डॉ. सिद्धार्थ तायडे
सनराईज इंग्लिश स्कुल व ज्युनिअर कॉलेजचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा
-----------------------------------
(प्रतिनिधी:- परळी वै. )
येथील सनराईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात सिने-नाट्य दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ शिक्षण तज्ञ व साहित्यिक ए. तू. कराड यांची उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मुंडे व उपाध्यक्ष हरिश्चंद्र चाटे यांचीही कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ शिक्षण तज्ञ तथा साहित्यिक ए. तू. कराड यांनी ज्ञान आणि कौशल्ये संपादन करून अधिक सक्षम व्हावे असे प्रतिपादन केले. पुढे बोलतांना त्यांनी पालक आणि गुरुजनांची मान उंचावेल असे कार्य करा .कोणत्या क्षेत्रात करिअर करायचंय ते स्वतः ठरवा. मी कोण आहे?या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर स्वतःलाच शोधावे लागते.असेही सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी शिकून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.तसेच ध्येय आधारित कृती आराखडा तयार करणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. वेळोवेळी आपल्या ध्येयांचे आणि कृती योजनांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्याला आपल्या आराखड्यात बदल करावे लागतील. पण एकदा का तुम्ही तुमच्या ध्येयांसाठी योग्य कृती आराखडा तयार केला आणि त्यानुसार काम केले, तर यश नक्कीच तुमच्या हातात असेल.असेही त्यांनी प्रतिपादन केले.
सनराईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या
विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांप्रती भावना
व्यक्त केल्या.विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच शाळेतील विविध आठवणींना उजाळा दिला.
पारितोषिक वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वाती चौधरी तर आभार मनोज नागरगोजे यांनी मानले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.संस्थेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र चाटे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे कसे जावे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
विविध स्पर्धेत नैपुण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात पदकं व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.अतिथी परिचय संदीपान मुंडे तर निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अनिकेत गित्ते आणि आभार प्रदर्शन हेमंत चाटे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा