आपली संस्कृती- आपली परंपरा: गीता परिवाराच्या वतीने शाळेत उत्साहात मातृ पितृ पूजन उपक्रम
परळी वैजनाथ, प्रतिनिधी... पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपली जाज्वल्य संस्कृती काहीशी विसरत जाणाऱ्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीचे महत्त्व व आपल्या परंपरांची जाणीव व्हावी या दृष्टिकोनातून विविध प्रकारचे डे साजऱ्या करण्यापेक्षा भारतीय संस्कृती प्रमाणे उत्सव साजरे करण्याचा उपक्रम 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी गीता परिवार परळीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. महर्षी कणाद विद्यालयात मातृ-पितृ पूजन उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
गीता परिवार परळी वैजनाथ च्या वतीने 14 फेबुवारी रोजी महर्षी कणाद शाळेत मातृपितृ पूजन हा उपक्रम राबविण्यात आला.विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचे संस्कार देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला.लहान मुलांना आई- वडीलांच्या त्यागाबद्दल सांगून आपले खरे हिरो हिरोइन आपले आई वडीलच असतात अशी भावना मुलांच्या मनात बिंबवण्यात आली.शोभा भंडारी व गीता परिवार च्या सर्व सदस्यांच्या परीश्रमाने कार्यक्रमाला सफलता मिळाली.गीता परिवारच्या अध्यक्षा ललिता जाजू व सदस्यांनी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. कार्यक्रमास पालक, कार्यकर्ता, शाळेच्या मुख्याध्यापिका भांगे मॅडम ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा