प्रचंड घोषणाबाजी: आ.सुरेश धस यांना परळीत दाखवले काळे झेंडे
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी परळी येथे आलेले आ. सुरेश धस यांच्या गाडीसमोर काळे झेंडे दाखवत कार्यकर्त्यांनी प्रचंड आक्रमक होत निदर्शने केली. मस्साजोग, केज येथे भेट देऊन परळीतील मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी भाजपचे आ. सुरेश धस परळी येथे आले होते.
मयत महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांना भेट देऊन बुडीत राजस्थानी मल्टिस्टेटच्या ठेवीदारांच्या आंदोलनस्थळी भेट देण्यासाठी आ. सुरेश धस जात असताना ही घटना छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घडली. परळीची बदनामी करणाऱ्यांचा धिक्कार असो, सुरेश धस मुर्दाबाद, चले जाव चले जाव च्या घोषणा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या. आदोलनात सहभागी आसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलीसांनी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा