लाखाच्या घरात किंमत असलेले दोन आयफोन,१५ हजार रोख रक्कम असलेली हॅन्डबॅग केली सुपूर्द 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        बीड जिल्हा बिहार बनल्याचे सवंग व आवाजवी अशा प्रकारचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. मात्र बोटावर मोजण्या इतक्या दुर्गुणांची रेष मोठी करताना या जिल्ह्यातील सद्गुणांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याची खंत बीड जिल्हावाशियांच्या मनात आहे. अशाच प्रकारची चांगुलपणाची खात्री दाखविणारी छोटी पण मोठा अर्थ असलेली बाब वैद्यनाथ मंदिरातील सुरक्षारक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या तत्पर व प्रामाणिक वर्तनातून दिसुन येत आहे.

         बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक येत असतात. नेहमीच वर्दळीचे ठिकाण असलेल्या वैद्यनाथ मंदिरात छोट्या- मोठ्या अनेक घटनाही घडत असतात. याच अनुषंगाने नाशिक येथील कु. कलंवती भदाणे ही युवती आपल्या कुटुंबीयांसह दर्शनाला आले होते.दर्शन झाल्यावर मंदिर परिसरात पायऱ्यांवर फोटो काढतांना हॅन्डबॅग बाजूला ठेवली.फोटो काढत काढत हॅन्डबॅग त्याचठिकाणी विसरुन गेले. बऱ्याच वेळाने हॅन्डबॅग तशीच पायर्‍यांवर असल्याचे कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षक बबली वाघमारे यांच्या निदर्शनास आले.कोणीतरी बॅग विसरून गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वैद्यनाथ मंदिर पोलीस चौकीत कार्यरत स.उपनि राजेभाऊ शेळके यांच्याकडे ही बॅग जमा करून भाविकांचा शोध घेण्याबाबत माहिती दिली. 

     या हॅन्डबॅगमध्ये दोन आयफोन व रोख रक्कम होती.यातीलच एका अनलाॅक असलेल्या फोनवरुन त्यांच्या नातेवाईकांना फोन करुन हॅन्डबॅग विसरल्याचा निरोप देण्यात आला.त्यानंतर संबंधित युवती मंदिर पोलीस चौकीत आली.संपूर्ण शहानिशा करून खातरजमा करून व पोलीस चौकीतील रजिस्टरला नोंद करून सहीसलामत या भाविकाला त्याची १५ हजार रुपये रोख रक्कम, दोन आयफोन असा ऐवज सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे भाविकाला मोठा दिलासा मिळाला. त्यांनी पोलीस व मंदिर प्रशासनाचे आभार व्यक्त केले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार