बदल्यांचा सिलसिला सुरुच: परळी थर्मलमधील आणखी नऊ तंत्रज्ञांच्या भुसावळला बदल्या
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी पदे रद्द होणे,शेकडो कर्मचाऱ्यांच्या इतरत्र पदस्थापना करणे, बदल्या करणे हा सिलसिला सुरुच असल्याचे दिसुन येत आहे.या अनुषंगानेच आता आणखी नऊ तंत्रज्ञांच्या भुसावळला बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, मुख्य कार्यालय, मुंबई यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये अनुसरून औ. वि. केंद्र, परळी-वै. या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या नऊ अधिकारी/कर्मचारी यांची प्रशासकीय बदली झाल्यामुळे त्यांना औ.वि.केंद्र, परळी-वै. या कार्यालयातुन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजु होण्याकरिता या कार्यालयातुन कार्यमुक्त करण्यात येत आहे.असे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. बदल्या झालेल्या तंत्रज्ञांत राहुलकुमार देवीदास वाळके, सचिन सावताराव राऊत, सुनील बाळासाहेब ढोकळे, योगेश मोहन म्हेत्रे, प्रदिप राजेंद्र कोमटवार, सतीश अशोषराव हरीहर, रवी दत्तात्रय दहिफळे, कृष्णा अर्जुन मुंढे, गोरखनाथ किशन खाटीक यांचा समावेश आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा