प्रा.सुनिल चव्हाण यांना पितृशोक;रघुनाथराव चव्हाण यांचे निधन
परळी(प्रतिनिधी)
जेष्ठ निवृत्त शिक्षक रघुनाथराव चव्हाण गुरुजी यांचे शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.न्यू हायस्कूल ज्यूनिअर कॉलेजचे प्राध्यापक बी.आर. चव्हाण( सुनील चव्हाण) यांचे ते वडील होते.त्यांच्या पार्थिवावर आज शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रघुनाथराव चव्हाण गुरुजी यांचे मृत्युसमयी वय ९४ वर्षांचे होते.वृध्दापकाळाने शुक्रवार दि.२१ रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पाश्चात मुलगा प्रा.सुनील चव्हाण,3 मुली,जावाई सुन,नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या पार्थिवावर शनिवार दि 22 रोजी सकाळी 9 वाजता शंकरपार्वती नगर येथून अंत्ययात्रा निघणार आहे.वैद्यनाथ मंदिर मागील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा