नेत्रदान ही काळाची गरज :प्रा. डॉ. एकनाथ शेळके यांचे प्रतिपादन

आंबाजोगाई (वसुदेव शिंदे):-

    नेत्रदान ही काळाची गरज असून भारतात नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण अत्यल्प आहे. यात मारवाडी, गुजराती व जैन समाजात नेत्र दान करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण अधिक आहे. या साठीच जनजागृती ही आवश्यक असून एक व्यक्तीने नेत्र दान केले तर तो दोन व्यक्तीला जग दाखवू शकतो असे प्रतिपादन अंबाजोगाई येथील स्वा रा ती रुग्णालयाच्या नेत्र रोग विभागाचे प्रा डॉ एकनाथ शेळके यांनी केले.

      अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात  राष्ट्रीय सेवा योजना व गृह विज्ञान विभागाच्या वतीने दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या "चॉकलेट मेकिंग व पॅकेजिंग सर्टिफिकेट कोर्स" च्या समारोप प्रसंगी नामांकित नेतृरोगतज्ञ डॉ एकनाथ शेळके हे बोलत होते. 

    या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ प्रीती पोहेकर, उप प्राचार्य डॉ दीपक फुलारी, कार्यक्रम अधिकारी डॉ मानीत कुमार वाकळे, डॉ नागेश यमगीर, डॉ प्रतीक मसारे यांची उपस्थिती होती.

     "*नेत्रदान एक वरदान*" या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ एकनाथ शेळके पुढे म्हणाले की, आपण प्रत्येक जन "*पाप पुण्य दान धर्म*" या गोष्टी लहान पना पासुन ऐकत आलो असून कोणत्याही प्रकारच्या दानाची व्याख्या व्यापक आहे. माणसाच्या व्याधी दूर करण्यासाठी ज्या प्रमाणे अवयवदान, देहदान त्याच प्रमाणे नेत्र दान ही असते.

ज्या  व्यक्तीच आयुष्य अंधकार मय झालेलं असेल त्यांच्या साठी वरदान म्हणजे नेत्र दान होय.

    आपण नेत्रदान पंधरवाडा साजरा करतो मात्र त्या साठी जनजागृती कमी पडते.

नेत्र हवे असणाऱ्यांची संख्या जास्त आहे मात्र नेत्र देणाऱ्यांची संख्या कमी आहे व याला अंधश्रधा हे एक प्रमुख कारण आहे.

उलट आपण मेल्यावर आपले डोळे दुसऱ्याला कामी येतात हा वैद्यानिक दृष्टिकोन समोर ठेवला तर तो पुनर्जन्म म्हणावा लागेल.

    मृत्यू नंतर डोळे दान करणे हा संकल्प म्हणजे नेत्रदान असून वय वर्ष , एक ते शंभर पर्यंत एवढेच नाही तर ज्यांचे ऑपरेशन झाले आहे त्या व्यक्ती सुद्धा मरणोत्तर नेत्रदान करू शकतात. फक्त रेबीज, एच आय व्ही, काविळ, कॅन्सर ग्रस्त रुग्ण नेत्रदान करू शकत नाहीत. त्या साठी नेत्र पेढी मध्ये फॉर्म भरून द्यावा लागतो.

मृत्यू नंतर नातेवाईकही नेत्र पेढीला कळवून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.

    मृत्यू नंतर मयत व्यक्तीच्या डोक्या खाली उशी ठेवावी, त्याचे डोळे बंद करावे, वरती थंड गार कपडा किंवा कापसाचा बोळा ठेवावा. मृत्यू नंतर मृत्यू प्रमाणपत्र काढून

चार ते सहा तासाच्या आत ते नेत्र काढून ती नेत्र पेढीत आणली जातात व त्याची प्रतवारी ठरवून त्याचा वापर केला जातो.चांगल्या प्रतवारीचे नेत्र इतर नेत्र हीन व्यक्ती साठी वापरली जातात व कमी प्रतवारीचे नेत्र हे संशोधन करण्या साठी वापरली जातात.

   भारतात नेत्रदान करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण अत्यल्प असून एक कोटी लोकांचा मृत्यू झाल्यास फक्त ४९ हजार लोक नेत्रदान करतात यात मारवाडी, गुजराती व जैन समाजात नेत्र दान करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण अधिक आहे.

    श्रीलंका या छोट्याशा देशात नेत्र दानाचे प्रमाण मोठे असून हा देश साठ देशांना नेत्र पुरवतो ही कौतुकाची बाब आहे.

वास्तविक एक व्यक्तीने नेत्र दान केले तर तो दोन जणांना जग दाखवू शकतो. गोर गरीब वंचित यांना नेत्र दानाचा फायदा अधिक होऊ शकतो त्या साठी अलीकडे नेत्रदानाचे

प्रमाण वाढले असले तरी त्या साठी जनजागृती करणे गरजेचे आहे. 

    सरते शेवटी डॉ शेळके यांनी "जिंदगी का क्या भरोसा मौत कभी बी आजाए, हम तो एसी जिंदगी जीना चाहते है जो औरो को काम आ जाए" या शेअर ने आपल्या मनोगताची सांगता केली.

    या वेळी बोलताना डॉ प्रीती पोहेकर मॅडम म्हणाल्या की, आपण पाश्चाती करण करताना भारती करण करण्याचा प्रयत्न करायला हवा तरच चांगले भवितव्य घडू शकते. नेत्र रुग्णा साठी आम्ही बारा वर्षा पूर्वी नेत्र कुंभ सुरू केलं आसुन याचा मी सदस्य आहे. आता पर्यंत सव्वादोन लाख नोंदण्या झाल्या असून त्यात एक लाख ७५ हजार तपासण्या झाल्या असून अठरा हजार नेत्र रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत .या साठी दीडशे डॉक्टर सेवा देत आहेत. या नेत्र कुंभात असंख्य साधू संतानी नेत्र तपासणी करून घेतली आहे. दृष्टी बाधित रुग्णांना दृष्टी देण्याचे मोलाचे काम केले आहे. 

    दृष्टी बाधित व्यक्तींची समस्या अनेक आहेत. माणसाला माणूस म्हणून जगता येत नाही. पावला पावलावर समस्या असते

आपण प्रत्येक जन एक नेत्र रोग्यांचा मित्र होऊन त्यांच्या अंधकारमय जीवनात दृष्टी  देण्याचे काम करून त्यांना प्रकाशाचीं किरने दाखवू शकतो 

      या प्रसंगी "चॉकलेट मेकिंग व पॅकेजिंग सर्टिफिकेट कोर्स" मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींनी आपले अनुभव कथन करत आपल्याला नवीन उद्योग उभारणीस प्रेरणा मिळाली असल्याचे  उदगार काढले व सर्वांना कोर्स मध्ये बनवण्यात आलेले चॉकलेट वाटप करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे सूत्र संचलन गृह विज्ञान विभागाच्या प्रमुख डॉ रोहिणी अंकुश तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे डॉ बाबा कागदे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !