अहिल्या गाठाळ यांचा सत्कार

लीनेन्स क्लब आंबाजोगाईच्या स्तन कर्करोग महिला जागरण मोहिमेचा शुभारंभ

अहिल्या गाठाळ यांचा लातुरात सत्कार 


आंबाजोगाई-(वसुदेव शिंदे):-

लीनेन्स क्लब आंबाजोगाईच्या कॅन्सर विषयी महिला जागरण मोहिमेचा प्रारंभ लातूर येथे झालेल्या लीनेन्स क्लबच्या राज्य स्तरीय मेळाव्यात करण्यात आला. या प्रसंगी कॅन्सर पासून सुरक्षित राहण्याच्या सूचनांचे पत्रक प्रकाशित करण्यात आले. त्यात आंबाजोगाईच्या अर्चना स्वामी या कर्करोग ग्रस्त महिलेचे निवेदन आहे.

लीनेन्स क्लबच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा शपथविधी, कॅबिनेट मिटिंग आणि पी.एस.टी. सेमिनार असा भरगच्च कार्यक्रम लातूर येथील वाडा हॉटेल येथे पार पडला. लीनेन्स डॉ मंजिरी कुलकर्णी व सुनीला नरपन्नवार यांची विशेष उपस्थिती होती. राज्यातील 29 क्लब्सचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहिल्या गाठाळ यांचा सत्कार

माँ से बेटी सवाई हा लीनेन्स क्लबचा उपक्रम आहे. त्यात लीनेन्स क्लबच्या सदस्यांच्या  कर्तबगार कन्येचा सत्कार केला जातो.

आंबाजोगाई लिलेन्स क्लबच्या कोषाध्यक्ष अयोध्या गाठाळ यांची कन्या, आंबाजोगाईची भूमीकन्या आणि लातूरच्या उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांचा लीनेन्स क्लबच्या राज्यस्तरीय मेळाव्यात डॉ मंजिरी कुलकर्णी आणि आंबाजोगाई लीनेन्सच्या अध्यक्ष आशा वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

या प्रसंगी कोषाध्यक्ष आयोध्या गाठाळ, सचिव ललिता पुजारी, कॅबिनेट लेनेस गयाताई कराड, डॉ. नयना सिरसाट तसेच सदस्य सुवर्णा देशमुख, सरोज जाजू, वर्षा देशमुख, इंदू गुट्टे, मंगल गोरे, उषा मोहिते, विजया खोगरे, सरस्वती फड, आशा कराड, माधवी झांबरे, रेवती साखरे ह्या आवर्जून उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !