छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा- प्रा. डी. के. आंधळे

 परळी प्रतिनिधी..... जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये रयतेचे राजे व बहुजन समाजाचे उद्धारक छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डी के आंधळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा असे गौरव उद्गार याप्रसंगी काढले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए आर चव्हाण, प्राध्यापक प्रतिनिधी  व विद्या परिषद सदस्य,डॉ पी एल कराड, उप प्राचार्य डॉ. व्ही. गायकवाड व प्रा.डी के आंधळे, डॉ बी के शेप यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के शेप यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. तर प्रमुख पाहुणे प्रा.डी के आंधळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या संदर्भात विस्तृत मांडणी केली. व छत्रपती शिवाजी महाराज  राज्यकारभार कशा पद्धतीने चालवीत होते याचे विविध उदाहरणे दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी  प्रशासकीय यंत्रणा योग्य रीतीने वापरली होती असेही सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या,डॉ. चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेवरील अन्यायाविरुद्ध लढून नेहमीच लोकांचे कल्याण केले.  छत्रपती शिवाजी महाराज हे एक मराठा योद्धा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक शासक होते. त्यांना अजूनही भारत आणि इतर देशांमध्ये त्यांच्या काळातील सर्वात महान योद्धा मानले जाते. ते एक लष्करी रणनीतीकार, कार्यक्षम प्रशासक आणि शूर योद्धा म्हणून ओळखले जातात.त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन  मराठा साम्राज्याची स्थापना केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. बी.के शेप तर आभार डॉ भीमानंद गजभारे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार