इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दि.१३फेब्रुवारी रोजी आयोजन...

 पाटोदा येथे शिवजन्मोत्सवा निमित्त मोफत आरोग्य तपासणी  व रक्तदान शिबीर

पाटोदा /अमोल जोशी 

    शिवजन्मोत्सवा निमित्त पाटोदा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि.१३फेब्रुवारी रोजी  मोफत आरोग्य व औषध उपचार व रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन  आ.सुरेश धस यांच्या हस्ते होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष बीड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक  थोरात राहणार आहेत.या शिबीरसाठी तज्ञ डॉक्टर्स सहभागी होत आहेत.

         या शिबिरात हदयरोग तज्ञ डॉ.किरण सवासे,जनरल सर्जन डॉ.अभिषेक जाधव,नेत्र तज्ञ डॉ.चंद्रकांत वाघ,अस्थीरोग तज्ञ डॉ.अभिनव जाधव ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.रूपाली सोळंके (जाधव) ,श्वसनविकार व अतिदक्षता तज्ञ डॉ.प्रशांत जाधव ,त्वचारोग तज्ञ डॉ.अनिल नागरगोजे ,मानसोपचार तज्ञ डॉ.अक्षय जाधव ,बालरोग तज्ञ डॉ.विशाल तांगडे ,स्त्रीरोग तज्ञ डॉ.पल्लवी तांदळे( बिनवडे) इत्यादी सहभागी होत आहेत.तरी  पाटोदा व परीसरातील गरजु रूग्णांनी याचा लाभ घ्यावा.

    तसेच १४फेब्रुवारी रोजी शिवशाहीर डॉ.देवानंद माळी यांचे शिवशाहीरी कार्यक्रम ,दि.१५फेब्रुवारी रोजी ह.भ.प.विशाल महाराज खोले यांचे किर्तन ,१६ फेब्रुवारी रोजी गणेश भोसले व कु.तेजस्विनी सावंत यांचे शिवव्याख्यान ,दि १७फेब्रुवारी रोजी पहिले ते पाचवी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन,दि.१८फेब्रुवारी रोजी सहावी ते दहावी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन ,दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व आकरा वाजता रांगोळी स्पर्धा होईल तसेच सांयकाळी  चार वाजता भव्य मिरवणुकीस प्रारंभ शुभहस्ते संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील व लोकनेते आ.सुरेश धस यांच्या हस्ते होईल.

      तरी कार्यक्रमास सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!