भोपल्याचा राजेश बनला महसूल सहाय्यक! 

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते- प्रा.टी.पी.मुंडे


परळी तालुक्यातील भोपला हे गाव  डोंगराळ भागात वसलेले आहे. भोपला गावचा राजेश गंगाराम मुंडे या युवकांनी महसूल सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्याच्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येते हा आदर्श घालून दिला आणि आपल्या आई-वडिलांचे तसेच आपल्या गावाचे नाव उंचावले असे प्रतिपादन महाराष्ट्राचे ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांनी केले. त्यांच्या संपर्क कार्यालयात त्याचा यथोचित शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीस त्याला शुभेच्छा दिल्या तसेच त्याचे वडील गंगाराम मुंडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.


   महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले. त्याचे आई-वडिलांनी काबाड  कष्ट करून त्याला शिकवले. त्याचे सततचे परिश्रम जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने यश संपादन केले. त्याचे वडील लहानपणापासून ओबीसी नेते प्रा.टी.पी.मुंडे सरांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात आजही ते कार्यालयात आपली सेवा देतात. त्याची आई मोलमजुरी करून मुलाबाळांचे शिक्षण आणि संसार चालवते. अतिशय गरीब परिस्थितीतून त्याने महसूल सहाय्यक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि एक आदर्श ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घालून दिला. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 


   यावेळी सूर्यकांत मुंडे, वडील गंगाराम मुंडे, प्रा. विजय मुंडे, जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे  (बबलू शेठ), ब्रह्मदेव मुंडे, भागवत मुंडे, भोपला गावचे सरपंच बाळासाहेब मुंडे , नंदनंजचे पोलीस पाटील गुट्टे , पिंटू डापकरआदी उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !