रुद्राभिषेक का केला जातो?
महाशिवरात्र पर्व: ज्योतिर्लिंग वैद्यनाथाला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने विधीवत रुद्राभिषेक
बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे सध्या महाशिवरात्री पर्व सुरू आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला.
बारा ज्योतिर्लिंगापैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचा महाशिवरात्री महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वैद्यनाथ देवस्थान च्या वतीने पारंपारिक पद्धतीने उत्सव आयोजित करण्यात आला आहे. दिनांक २६ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत वैद्यनाथ प्रभूंचे पारंपारिक उत्सव होणार आहेत.
रुद्राभिषेक का केला जातो?
ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भगवान शंकर ज्योतीच्या तेजोमय रुपात शिवलिंगात प्रगट झाले आहेत. ज्योतिर्लिंग याचा अर्थ आत्मज्योत असा आहे. ही उपासनेसाठी आहेत. शिवलिंगाची उपासना म्हणजे लिंगावर रुद्राभिषेक करणे.भगवान शंकराला अभिषेक अतिशय प्रिय आहे. सतत अभिषेकाने तो लवकर प्रसन्न होतो. म्हणून जेथे जेथे शंकराची पिंडी असेल तेथे पाण्याची संतत धार पडावी अशी व्यवस्था केलेली असते. शिवलिंगाच्या अभिषेकाचे पाणी जाण्याचे टोक उत्तरेकडे असते. कारण ते उत्तरेकडे असणाऱ्या गंगानदीकडे जाते, ही भावना असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा