वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले
महाशिवरात्र पर्व:पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर येथे नयनरम्य विद्युत रोषणाई
वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे महाशिवरात्र पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते.तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक महाशिवरात्र पर्वावर प्रभु वैद्यनाथ दर्शनासाठी दाखल होत असतात. या अनुषंगानेच परळीत सध्या महाशिवरात्र पर्वाची जोरदार तयारी करण्यात आली असुन वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले आहे.
धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मंदिर व परिसरात वेगवेगळ्या सजावटी करण्यात येत आहेत. दरवर्षीच विद्युत रोषणाई व नेत्र दीपक फुलांची सजावट करण्यात येते. संपूर्ण मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असुन वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगांच्या विद्युत रोषणाईने झगमगित झालेला आहे. बदलत्या रंगछटांनी मंदिराला क्षणाक्षणाला रंगीबेरंगी स्वरूप आल्याचे मनमोहक चित्र अनुभवता येत आहे. सायंकाळ नंतर तर ही रोषणाई नयनरम्य व लक्षवेधी ठरत आहे.अवघ्या दोन दिवसांवर म्हणजेच २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र असुन आदल्यादिवशीच (दि.२५) रोजी रात्रीपासूनच दर्शनरांगा लागतात.यादृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या दुपारनंतर मंदिर परिसरात आकर्षक अशी पुष्प सजावटही करण्यात येणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा