परळी औ. वि. केंद्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
परळी /प्रतिनिधी....परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात प्रशासकीय सभागृहात दि २० रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची २१३वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव संसाधन विभागाचे विलास ताटे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.
शरद राठोड यावेळी म्हणाले की,बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म २० फेब्रुवारी १८१२ रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले येथे झाला.
बाळशास्त्री जांभेकर हे लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते. त्यांनी मराठी, संस्कृत, गणित शास्त्रअशा आनेक विषयात सखोल अभ्यास केला होता.मराठी वृत्तपात्राचे जनक, आद्य पत्रकार म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून ६ जानेवारी हा दिवस "पत्रकार दिन" म्हणून साजरा केला जातो.त्यांनी आनेक सामाजिक विषय आपल्या वृत्त पत्रातून मांडले आहेत.
या वेळी औष्णिक विद्युत केंद्राचे सुरक्षा अधिकारी बी आर अंबड, वित्त व लेखा विभागाचे रमण मिटके, Ash Utilization Cell च्या कार्यकारी अभियंता शगीना इस्लाम , सहाय्यक अभियंता अरुण गिते, पत्रकार भगवान साकसमुद्रे, कृष्णा वाघमारे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गजले यांनी केले तर उपस्थितांचा आभार सहाय्यक कल्याण अधिकारी शरद राठोड यांनी मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा