इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 ना. पंकजा मुंडे महाकुंभमेळ्यात सहभागी ; आई प्रज्ञाताईंसह त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान

मुंबई ।दिनांक २४। 

राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे आज (ता. २४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचल्या. यावेळी त्यांनी आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले.


  प्रयागराज येथील घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली. प्रयागराजमधील कुंभमेळ्यात ना. पंकजाताई व यांनी आई प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले. तसेच त्यांनी यावेळी त्रिवेणी संगम येथे आरती आणि प्रार्थना देखील केली.

अद्भुत अन् अद्वितीय अनुभव - ना. पंकजाताई

-----

यावेळी माध्यमांशी बोलतांना ना. पंकजाताई म्हणाल्या,

महाकुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचा आणि इथल्या वातावरणाचा अद्भुत आणि अद्वितीय असा अनुभव मला आला. २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याची तयारी कशी करता येईल याचा अभ्यास आम्ही इथे केला. एवढी प्रचंड गर्दी असूनही प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याची व्यवस्था अतिशय चोख आणि नियोजनबद्ध आहे त्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व त्यांच्या टीमचे त्यांनी मनापासून कौतूक केले. खरचं, मन भारावून गेले.. हा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपासून ते कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत सर्व जण खूप परिश्रम घेत आहेत याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उत्तरप्रदेशच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी केली चर्चा

---------

ना. पंकजाताई मुंडे यांनी उत्तरप्रदेशमधील पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील या दौऱ्यात चर्चा करून इथल्या पर्यावरण विषयक बाबींचा अभ्यास केला. नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यात याचा कसा उपयोग करून घेता येईल याचीही माहिती त्यांनी घेतली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!