मुख्यमंत्री फडणवीस सहकुंटुंब महा कुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.१४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहोचले. यावेळी त्यांनी सहकुंटुंब त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. प्रयागराज येथील अरैल घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली.
प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, आई सरीता फडणवीस आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांनीदेखील त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१४४ वर्षांनंतर होणाऱ्या तीर्थराज प्रयागच्या महाकुंभाच्या भव्य समारंभाची व्यवस्था. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या सरकारची ही एक मोठी कामगिरी आहे, एक हिंदू म्हणून मीही येथे पवित्र स्नान करण्यासाठी आलो आहे. अशी त्यांनी एक्स पोस्ट देखील केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा