Mahashivratri 2025: महाशिवरात्र पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. !!!!

महाशिवरात्र पर्व : परळीत पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात नयनरम्य पुष्पसजावट !

परळी वैजनाथ, ..

        महाशिवरात्र पर्वानिमित्त मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेमार्फत संपूर्ण वैद्यनाथ मंदिर विविध फुलांच्या सजावटीने बहरले असून अत्यंत आकर्षक सजावट व विविध आकर्षक फुलांची आरास मंदिर परिसर, गाभारा व सर्व ठिकाणी करण्यात आली आहे.  

         महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचे अनन्य साधारण महत्व आहे.महाशिवरात्र पर्वकाळात या ठिकाणी देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. आज(दि.२५) मध्यरात्रीनंतर दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात येणार आहे. रात्री ९ वा.पासूनच दर्शन रांगामध्ये भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाले आहेत. महाशिवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने मंदिर गाभारा व परिसरात झेंडूसह निशिगंधा, गुलाब, जरबेरा, शेवंती, अर्केट, लिलिअम, ब्लुडेझी यासह सुमारे 21 प्रकारातील 7 क्विंटल फुलांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 

सुटसुटीत दर्शन व्यवस्था

       देशभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत महाशिवरात्रीनिमित्त (ता. २६) विविध कार्यक्रम आणि यात्रा सुरू होणार आहे. दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने तयारी करण्यात आलेली आहे.लाखो भाविक येथे दाखल होतील. त्यांना दर्शन घेणे सुकर व्हावे म्हणुन धर्म दर्शनमध्ये पुरुष व महिलांच्या स्वतंत्र रांगांची व्यवस्था आहे.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था...

  महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी संख्या लक्षात घेवून दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होवू नये, संपूर्ण व्यवस्था सुरळीत व सुरक्षित पार पाडली जावी या दृष्टीकोनातून पोलिसांच्या वतिने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २० पोलीस अधिकारी,१५० महिला व पुरुष कर्मचारी,१०० होमगार्ड, एक दंगल नियंत्रण पथक (25 कर्मचारी),डीबी पथक,शहर वाहतूक पथक,  अग्निशमन पथक सुरक्षेसाठी तैनात केल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. दरम्यान भाविकांनी दर्शनाला जातांना पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !