इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

 परळी लोकन्यायालयात प्रकरणे 122 प्रकरणे तडजोडीने निकाली

परळी वैजनाथ..... 

परळी तालुका विधी सेवा समिती व परळी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी व फौजदारी तथा विविध बँका पतसंस्था महावितरण  इत्यादी संस्था यांचे प्रकरणे  सामंजस्याने व तडजोडीने निकाली काढण्यात आली. 


        दिनांक 22  मार्च 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या लोक अदालतीत दाखल पूर्व व दाखल प्रकरणे मिटले 122 आणि रक्कम वसुली 1 कोटी 38 लाख 18 हजार 244 रुपयांची बँक पतसंस्था यांची वसुली झाली आहे .सदर लोकन्यायालयात पंच म्हणून परळी न्यायालयाचे न्या एस बी गणाप्पा न्या डि व्ही गायकवाड ॲड सायस मुंडे ॲड प्रविण फड  यांनी काम पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्यासाठी न्या परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड एच व्ही गुट्टे ॲड आर.व्हि.गित्ते अँड ॲड आर व्हि देशमुख .ॲड मिर्झा मंजुर अली ॲड.माधवराव मुंडे ॲड वैजनाथ नागरगोजे .ॲड दिलीप स्वामी  ॲड प्रभाकर सातभाई ॲड वसंतराव फड उपाध्यक्ष ॲड दस्तगीर सचिव ॲड शेख शकीक ॲड डि.एल.उजगरे.ॲड.नागापूरकर ॲड जीवनराव देशमुख ॲड अनिल मुंडे ॲड गजानन पारेकर  ॲड लक्ष्मीकांत मुंडे ॲड डि.पी.कडबाने ॲड विलास बडे ॲड लक्षमण अघाव ॲड उषा दौंड  ॲड कल्याण सटाले  ॲड मार्तँड शिंदे ॲड .लक्षमण गित्ते ॲड जगन्नाथ आंधळे  ॲड ज्ञानोबा मुंडे  ॲड मोहन कराड  ॲड सुनिल सोनपीर ॲड. दिनकर वाघमोडे  ॲड आबा सोळंके ॲड केशव अघाव  ॲड अर्जुन सोळंके  ॲड शाकेर सय्यद ॲड सुल्तान सहाय्यक अधीक्षक गिरीधर जोशी हाश्मी गणेश कलशेटे बडगिरे सुंदर मुंडे अमित गजबार कृष्णा कळसदकर सचिन कळसकर गंगणे शेख अर्शद सह वैद्यनाथ बँकेचे शाखाधिकारी उत्तम बाबुराव जोशी शंकर यादव रघुनाथ फड राहुल गोपणपाळे ज्ञानेश्वर पतसंस्थेचे बालाजी भोयटे एस टी बँकेचे राजेश कंगळे महावितरणचे आलापुरे बालाजी गित्ते ईत्यादी यांनी सहभाग घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या