सोमवारी ईपीएस-1995 पेन्शनसाठीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-
सर्व ईपीएस सभासदांना कळवण्यात येते की दि. २४ / ३ / २०२५ सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता बीड येथे जिल्हाधिकारी साहेबांच्या कार्यालया समोर समोर उपस्थित राहून तिथे आपणा सर्वांना आपल्या पेन्शनच्या मागणीचे निवेदन देशाचे पंतप्रधान साहेब यांना जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत द्यावयाचे ठरले आहे तरी आपणा सर्वांची उपस्थिती महत्वपूर्ण असून ज्यांच्याजवळ टी-शर्ट आहे त्यांनी टी-शर्ट घालून घ्यावे तसेच सध्या मोठया प्रमाणात ऊन्हाचा तडाखा असल्यामुळे डोक्यावर संरक्षण म्हणून गमजा देखील सोबत आणावा तसेच सर्वांनी वेळेवर हजर राहावे व या कार्यक्रमासाठी मदत करावी अशी विनंती कमांडर साहेब यांनी केली असून आदेश दिल्यामुळे आपणास उपस्थित राहण्याचे आवाहन मराठवाडा अध्यक्ष दादा देशमुख यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा