बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांचा देशव्यापी लाक्षणिक संप :परळीतही सहभाग
ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने पुकारलेल्या 20 मार्च 2025 रोजी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशव्यापी लक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. या संपातील प्रमुख मागणी सर्व वर्गात पुरेशी नोकर भरती हीच आहे. बँकेच्या शाखामध्ये कमी स्टाफ असल्यामुळे ग्राहकांना चांगली सेवा देणं बँक कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे तसेच कर्मचाऱ्यांना अतिरीक्त ताण तणाव सहन करावा लागत आहे. संघटनेच्या मागण्या मधे पीटीएस ची पुरेशी कायमस्वरूपी भरती करणे, सब-स्टाफ आणि लिपिक संवर्गात पुरेशी नोकर भरती करणे, कराराप्रमाणे विशेष सहाय्यक पदे भरणे, द्विपक्षीय संबंध पद्धतीची पुन्हा स्थापना करणे, संघटना कार्यालये संघटनांना पुन्हा उपलब्ध करून देणे, डी-ज्यूरे कराराचे काटेकोर पालन करणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. या संपा मध्ये बँकेचे कर्मचारी भाग्यश्री साखरे, मीना जोशी, दीपक घाडगे, शिवरत्न आघाव, सुंदर गायकवाड सामील झाले आणि संप यशस्वी केला.
उत्कृष्ट आणि विस्तृत कव्हरेज !
उत्तर द्याहटवासर्व सहभागी
कॉमरेडस ना लाल सलाम !!!!!
🚩🫡