परळी तालुका शिवसेनेवर कौतुकाची थाप आढावा बैठकीत -परशुराम जाधव 


शिवसेनेच्या ध्येयानुसार 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण परळी तालुका शिवसैनिकांनी केले  प्रा. सुनील धांडे 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

परळी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप देऊन परळी तालुक्यातील संघर्ष काळामध्ये येथील शिवसेना संघटना जोपासण्याचे कार्य कौतुकास पात्र आहे असे उद्गार काढले.

तसेच पुढे शिवसेना बीड जिल्हा लोकसभा प्रमुख प्रा. सुनील धांडे सर यांनी परळी तालुक्यातील शिवसेनेने शिवसेनेच्या ध्येयाप्रमाणे 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करण्याचे काम केले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनाप्रमुख आदित्यजी  ठाकरे यांच्या आदेशानुसार  शिवसेना संपर्क नेते सुनील जी प्रभू मराठवाडा समन्वयक विश्वनाथ शिवसेना उपनेते सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना आढावा बैठकीचे आयोजन परळी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय पालीवाल पॅलेस येथे बैठक घेण्यात आली या बैठकीची सुरुवात करताना आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शिवसेना बीड जिल्हा प्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीस शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख परशुराम जाधव यांनी बैठकीस मार्गदर्शन करून परळीतील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी परळीतील अशा संघर्ष काळात शिवसैनिकांचे कार्य कौतुकास पात्र आहे असे उद्गार काढले व कौतुकाची थाप दिली शिवसेनेचे बीड जिल्हा लोकसभा प्रमुख प्राध्यापक सुनील धांडे सर यांनी परळी तालुक्यातील शिवसेनेने शिवसेनेच्या ध्येयाप्रमाणे 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करण्याचे कार्य केले यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊरावजी भोईटे बीड उपजिल्हाप्रमुख नारायणरावजी सातपुते युवा सेना जिल्हाअधिकारी सोमेश भैय्या गीते महिला आघाडीच्या जिल्हा संघटक  डॉक्टर नयनाताई शिरसाठ अंबाजोगाई महिला आघाडीच्या तालु संघटक रेखाताई परळी तालुका महिला आघाडी संघटक प्रमिलाताई लांडगे यांनीही या आढावा बैठकीस आपापले मनोगत व्यक्त केले .या आढावा बैठकीचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालीवाल यांनी केले व सूत्रसंचालन शिवसेना शहरप्रमुख राजेश विभुते यांनी केले या आढावा बैठकीचे आभार प्रदर्शन शिवसेना विधानसभा प्रमुख जगन्नाथ साळुंके यांनी केले शिवसेना आढावा बैठकीचे विशेष परिश्रम शिवसेना उपतालुकाप्रमुख महेश केंद्रे शिवसेना तालुका सचिव प्रकाश साळुंके यांनी घेतले तर या बैठकीला शिवसेनेचे तालुका समन्वय भरतराव इंगळे शिवसेना तालुका संघटक सतीश जगताप शिवसेना सर्कल प्रमुख बबन ढेंबरे पृथ्वीराज उंबरे सुरेश परदेशी भालचंद्र फड सचिन गोरे शिरसाळा शहर प्रमुख संतोष सुरवसे युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन लोढा युवा सेनेचे दीपक व्यवहारे व कृष्णा मुंडे आढावा बैठकीमध्ये युवा सेनेमध्ये नवीन प्रवेश देण्यात आले युवराज गीते ज्ञानेश्वर नागरगोजे तसेच या आढावा बैठकीमध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख विजय जाधव विशाल सुगरे हरीश पालीवाल राहुल उपाडे स्वप्निल गायकवाड इत्यादी शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक या आढावा बैठकीस उपस्थिति  लावली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार