20 मार्च चिमणी दिन : योगेश्वरी ग्रीन आर्मीच्यावतीने एक घास चिऊसाठी उपक्रम

पक्षांना चारा व पाणी घरावर ठेवून सत्कर्म करा - वनश्री मेजर एस पी कुलकर्णी


अंबाजोगाई (वसुदेव शिंद)...

आज जागतिक चिमणी दिवस. पृथ्वीतलावर मनुष्य, वनस्पती, प्राणी एकमेकांवर अवलंबून आहेत. काही वर्षांपूर्वी हे सर्व गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सहकार्याने राहत होते. पण मानवाने निसर्गामध्ये ढवळाढवळ केली. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. त्यामुळे पक्षांच्या घरांना उध्वस्त केले. त्यांना राहिला जागा नाही त्यामुळे त्यांचे स्थलांतर व विनाश होण्यास सुरुवात झाली. चिमणी हा पक्षी उपयुक्त आहे. पण त्याचीही विध्वंस मानवाने केला मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला. चिमणीचा चिवचिवाट याला कंटाळून चीनमध्ये एक वर्षी पूर्ण चिमण्या नष्ट करण्याचा उपक्रम राबवला. तेव्हा त्या देशातील बटाट्याची शेती धोक्यात आली. कारण बटाट्याच्या पिकावर येणारी अळी केवळ चिमणीच खाते त्यामुळे चिमणी वाढविण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले गेले. आज आपल्या देशात ही चिमण्या नष्ट होत आहेत. तेव्हा त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर वृक्ष ,पशुपक्षी यांचे महत्त्व जाणून निसर्गाशी नाते जोडण्यासाठी ग्रीन आर्मी संदेश वाहक आहे. मानवाने पर्यावरणाचा ऱ्हास केल्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला. अशा दुष्काळात चिमण्या जगावे म्हणून २०१० पासून ४५ देश एकत्र आले व त्यांनी पुन्हा चिमण्यांचा किलबिलाट व्हावा यासाठी चिमणी संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. प्रदूषण, शेतीमधील रासायनिक खतांचा वापर, टॉवर्समुळे चिमण्या नष्ट होतात. तेव्हा आपण असा संकल्प करूया एक घास चिऊ साठी हा उपक्रम पर्यावरणीय व्यक्ती ,शाळा, महाविद्यालय बागेत घरावर चिमण्यांसाठी पाणी व चारा ठेवून उन्हापासून त्यांना चटके बसू नये म्हणून हा उपक्रम राबवूया व त्यांची घरटे बांधण्यासाठी पुन्हा आपण त्यांची घरट्यासाठी जागा म्हणजेच पुनर्वसन करून त्यांचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न यातून सोडवावा म्हणून हे चिमणी संवर्धन राबवूया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !