खोलेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी श्री धनंजय जब्दे , उपाध्यक्षपदी श्रीमती सुरेखा काळे, सचिवपदी श्री सतिश वांगे , कोषाध्यक्षपदी श्रीमती ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील खोलेश्वर शिक्षक सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची निवडणूक 2025 - 30 बिनविरोध संपन्न झाली. नवनिर्वाचित संचालकांनी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध केली. अध्यक्षपदी धनंजय जब्दे , उपाध्यक्षपदी सुरेखा काळे, सचिवपदी सतिश वांगे , तर कोषाध्यक्षपदी ज्योती शिंदे यांची निवड करण्यात आली.
खोलेश्वर पतसंस्थेच्या नवनिर्वाचीत संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आर एस पवार यांच्या उपस्थितीत दिनांक 28/03/2025 रोजी संपन्न झाली. सर्व संचालकांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करण्याचे जाहीर केले.
अध्यक्षपदी खोलेश्वर विद्यालयाचे धनंजय जब्दे , उपाध्यक्षपदी सुरेखा काळे, सचिवपदी सतिश वांगे, कोषाध्यक्षपदी ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. या बैठकीला नवनिर्वाचित संचालक उमेश डोंगे , मधुकर जाधव, रूपाली मुळे, सपना डुकरे, ज्योती शिंदे जाधव, शंकर देशपांडे, अमोल मोरे यांची उपस्थिती होती. पतसंस्थेचे कार्यालयीन कामकाज गोपाळकृष्ण बाभूळगावकर यांनी पाहिले.
बैठकीनंतर पतसंस्थेचे मार्गदर्शक डॉ.अतुल देशपांडे, खोलेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक जोशी, पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे, प्रशांत पिंपळे ,पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, ज्येष्ठ सभासद वर्षा मुंडे यांनी सर्व पदाधिकारी व नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यापुढेही सभासदांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हितासाठी पतसंस्था कार्य करेल व पतसंस्थेच्या उन्नतीसाठी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा