मोटारसायकल वरून करत होता गुटख्याची विक्री: त्यावरून पोलिसांनी साठाच पकडला - एक लाख 41 हजाराचा मुद्देमाल जप्त
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचारी गस्त घालत असताना एक संशयित मोटर सायकलस्वार आढळून आला. त्याची तपासणी केली असता मोटर सायकल मध्ये एका गोणीतून अवैध गुटख्याची विक्री करत असल्याचे आढळल्या वरून त्यास वाहना सह ताब्यात घेण्यात आले. अधिक माहिती घेतल्यानंतर त्याने साठा करून ठेवलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी कारवाई केली. यात एक लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिसांनी केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की,परळी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आज पोलीस पेट्रोलिंग करत असताना, गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम मोटारसायकल वर गुटखा विक्री करत आहे. या माहितीवरून संबंधित वाहनाचा शोध घेता, संशयितरित्या एका मोटारसायकल वर एक इसम दिसुन आला. गाडीची दोन पंचा समक्ष झडती घेता मोटारसायकल वर पांढर्या पोत्यात गुटखा दिसुन आला.हे वाहन पोलीस ठाणे येथे आणून पंचा समक्ष वाहनाची झडती घेतली. तसेच त्याच्या पत्र्याच्या शेडची झडती घेतली. शेड मध्ये पांढऱ्या गोन्या भरलेला आर एम डी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 1,41, 363 /-रुपयाचा मुद्देमाल आरोपी अनिस रसूल सय्यद, रा. मालीकपुरा याच्या ताब्यात मिळून आला. सविस्तर पंचनामा करून पोनि. रघुनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. सपोनी नितीन, योगेश व, पो अंम. गोविंद, हे.काॅ. पंडित, हे.काॅ.बाळू , पो.काॅ. पंडित,पो.काॅ. रेडेवाड यांनी ही कारवाईची कामगिरी केली. अ गुन्हा दाखल करून पुढील तपास सूरु आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा