अंबाजोगाई येथील पत्रकार दादासाहेब कसबे यांना पितृशोक
अंबाजोगाई( वसुदेव शिंदे)
अंबाजोगाई शहरातील जेष्ठ पत्रकार व अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दादासाहेब कसबे यांचे वडील आश्रुबा नामदेव कसबे (वय 80) यांचे दीर्घ आजाराने गुरुवार दि २० मार्च रोजी रात्री ८:३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज शुक्रवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दासोपंत मंदिर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
आश्रूबा नामदेव कसबे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना शिक्षण देऊन स्वतः धम्मकार्याला वेळ दिला तसेच तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचा आणि शांतीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्याचे काम केले. मिलिंद नगर भागात उभारण्यात आलेल्या नालंदा विहार च्या उभारणीमध्ये अश्रुबा कसबे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. स्वतः भाजी विक्रीचा व्यवसाय ते सदर बाजार नाका या ठिकाणी करत होते. व्यवसायाची तमा न बाळगता सामाजिक कार्यात त्यांनी बहुमोल असे योगदान दिले.अश्रुबा नामदेव कसबे हे गेल्या महिनाभरापासून आजारी होते त्यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दररोज उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते मात्र रात्री ८.३० च्या दरम्यान अचानक त्यांचे दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते ८० वर्षांचे होते. कडवे आणि निष्ठावंत सच्चे भीमसैनिक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच मिलिंद नगर परिसरात शोककळा पसरली.त्यांच्यावर शुक्रवार दि. २१ मार्च रोजी दासोपंत मंदिर परिसरात असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्याच ठिकाणी उपस्थितांच्या वतीने अश्रुबा नामदेव कसबे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या पश्चात ४ विवाहित मुले व ४ विवाहित मुली, सुना, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. पत्रकार दादासाहेब कसबे व त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात सर्व पत्रकार बंधु व.परिवार सहभागी आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा