बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटना (लाल बावटा) च्या वतीने संघटनेच्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर दि. 24 फेब्रुवारी रोजी आर्य समाज मंदिर येथे घेण्यात आले.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आरोग्य तपासणी पथकाने 220 बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी केली व त्यांना कार्ड वाटप केले. तपासणी शिबीरत कामगारांचे रक्त तपासणीसाठी घेतले जाते व आठ दिवसानंतर रिपोर्टसह गोळ्या औषध दिले जाते. कामगारांस पुढील उपचारासाठी परळीत कराड हास्पिटलची निवड केलेली आहे. बीड मध्ये तीन अद्ययावत हाॅस्पिटलची निवड केलेली आहे. आरोग्य तपासणी शिबिरात कामगारांच्या लिव्हर तपासणी अत्याधुनिक उपकरणा द्वारे केली.आरोग्य पथकात डॉ. मनीषा महाजन, ब्रदर शरद परके, व सिस्टर रोहिणी चिंचनकर सहह इतर सहा कर्मचारीवर्ग सहभागी झाला. आरोग्य तपासणी शिबीर सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सुरु होते. शिबीरात उपस्थित बांधकाम कामगारांना नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रा.बी.जी. खाडे, सरचिटणीस जालिंदर गिरी, शेख जावेद, कामगार नेते प्रकाश वाघमारे, नवीद मोजन, शेख अजहर, काॅ. किरण सावजी, अविनाश जाधव, बाबासाहेब रोडे आदींची उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा