शेकडो विवाह इच्छुकांना लाभ
लिंगायत कोष्टी समाज संस्थेच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
वधू-वर परिचय मेळावे विवाह जुळवण्यासाठी उपयुक्त – डॉ. नंदकुमार वसवाडे
अंबाजोगाई (प्रतिनिधी) – समाजातील वधू-वरांच्या विवाह जुळवण्यासाठी ओळख व संवाद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा मेळाव्यांमुळे पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते. त्यामुळे वधू-वर परिचय मेळावे नियमितपणे आयोजित होणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 मार्च 2025 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, माळीनगर, अंबाजोगाई येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेकडो वधू-वर पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वसवाडे म्हणाले, "प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलामुलींना चांगला जीवनसाथी मिळावा. अशा मेळाव्यांमुळे योग्य जोडीदार शोधण्यास मदत होते आणि विवाह जुळवणीसाठी बाहेर फिरण्याचा त्रास वाचतो. त्यामुळे असे मेळावे वारंवार होणे आवश्यक आहे."
उत्कृष्ट आयोजन व मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संजय डहाके, तर अध्यक्ष म्हणून डॉ. नंदकुमार वसवाडे हे उपस्थित होते. तसेच बारामती येथील फौजदार बजरंग कोरवले, पुणे येथील फौजदार श्रीमती श्वेता नरखेडकर, महाराष्ट्र राज्य महिला लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनंदा अष्टगी, तसेच सचिन हळदे, परमेश्वर जावळकोटी, शंकर बेले, महादेव निराळे, सचिन ढोपरे, चिंतामण पारीशवाड, अनिल तुळसनकर, श्रीमती शीतल वांढरे, प्रशांत वैंदकर, किरण कोष्टी, दीपक काटे, श्रीशैल मालापुरे, सतिश बिडवे आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
शेकडो विवाह इच्छुकांना लाभ
या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाह इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांना योग्य जोडीदार निवडण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली. राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
नितीन जुजगर व डॉ. अशोक शिनगारे यांचा विशेष सत्कार
समाजाच्या सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय योगदान देणारे माजलगाव येथील श्री. नितीन जुजगर आणि "एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे डॉ. अशोक शिनगारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांचे योगदान
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंबाजोगाई येथील लिंगायत हटगर कोष्टी समाजाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. समाजातील विवाहसंस्थेला बळकटी देणारा आणि समाजातील कुटुंबांना जोडणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला.
धन्यवाद रविभाऊ आपला मनापासून आभारी आहे
उत्तर द्याहटवा