इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सरकारकडे विषय मांडण्याचे अश्वासन...

ॲड.उज्वल निकम यांची भेट घेत आश्रमशाळा शिक्षकांनी मांडली आपली कैफियत !

शंभर टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी दोन दिवसांपासून उपोषण सुरु

बीड, प्रतिनिधी:-राज्यातील फुले, शाहू, आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना व्हीजेएनटी  संहितेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करून शंभर टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी दोन दिवसांपासून  बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाहू फुलेआंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्याच्या वतीने आमरण उपोषण सुरु केलेले आहे. आज विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम हे बीड येथे आले असतांना त्यांची भेट घेत आश्रमशाळा शिक्षकांनी आपली कैफियत मांडली.

      शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवसांपासून  आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणास्थळी शेकडो शिक्षक कर्मचारी दाखल होत आहेत.स्व. धनंजय अभिमान नागरगोजे यांच्या कुटुंबास ५० लक्ष रुपये तात्काळ मदत देण्यात यावी,त्यांच्या पत्नी राजकन्या धनंजय नागरगोजे यांना शासकीय सेवेत घेण्यात यावे व राज्यातील  शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना व्हीजेएनटी संहितेनुसार वेतनश्रेणी प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी हे आमरण उपोषण केले जात आहे. या आमरण उपोषणात राज्यातील  शेकडो शिक्षकांसह कर्मचारी  सहभाग घेत आहेत. आज विशेष सरकारी वकील ॲड.उज्वल निकम हे बीड येथे आले असतांना त्यांची भेट घेत आश्रमशाळा शिक्षकांनी आपली कैफियत मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!