मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पर्यावरणस्नेही होळीच्या शुभेच्छा

निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा...! संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा...!

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पर्यावरणस्नेही होळीच्या शुभेच्छा

मुंबई, दि. 12 - होळी व धुलीवंदना निमित्त सर्वांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी या उपक्रमाच्या अनुषंगाने आज पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री  अजित पवार यांना पर्यावरणपूरक पाच रंगाचा समावेश असलेले पॅकेट देऊन पर्यावरणस्नेही होळी साजरी करण्याच्या शुभेच्छा दिल्या.

होळी व धुलीवंदन तसेच रंगपंचमी हा सण राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते. रंग खेळताना ते पर्यावरण व नैसर्गिक असावेत, यासाठी जनजागृती आवश्यक आहे. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण पूरक होळी, धुलिवंदन व रंगपंचमी साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनीही पर्यावरण पूरक होळी, रंगपंचमी व धुलिवंदन साजरी करण्याचे आवाहन केले आहे. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सागर निवासस्थानी जाऊन तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना विधानभवनात भेटून पर्यावरण पूरक रंगाचे पॅकेट देऊन शुभेच्छा दिल्या. 


०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !