वैद्यनाथ कॉलेज: ‘बुक टॉक’ कार्यक्रम

 “चार्ल्स डार्विनच्या ग्रंथाची चिकित्सा – विद्यार्थ्यांना नवदृष्टी-डॉ. टी ए गित्ते

वैद्यनाथ कॉलेज ‘बुक टॉक’ कार्यक्रम उत्साहात संपन्न  

परळी ......परळी जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज, परळी येथे दि. २० मार्च २०२५ रोजी ग्रंथालय विभागाच्या वतीने ‘बुक टॉक’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. डॉ. टी. ए. गित्ते  (विभागप्रमुख, वनस्पतिशास्त्र विभाग, वैद्यनाथ कॉलेज) यांनी चार्ल्स डार्विन यांच्या ‘On the Origin of Species’ या ग्रंथावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य महोदय, तर उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड विशेष उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. एम. जी. लांडगे यांनी केले.  

डॉ. गित्ते  यांनी आपल्या व्याख्यानात डार्विनच्या उत्क्रांती सिद्धांताची संकल्पना, त्याचे विज्ञान व समाजावरील परिणाम, तसेच जीवसृष्टीतील नैसर्गिक निवडीचा महत्त्वाचा सिद्धांत स्पष्ट केला. उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी यावेळी डार्विनचे महत्त्वाचे सिद्धांत उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच सर्वच प्राण्यांच्या अस्तित्वरच्या प्रश्नावर उत्तर देताना, मानवाचे  पूर्वज हे माकडच असून लाखो वर्षांपूर्वी १०० पैकी ४ टक्के माकडावरच उत्क्रांती झाली आणि माणसाचा विकास झाला.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महोदयांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा आणि अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांचे वाचन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कार्यक्रमाचे आयोजक ग्रंथपाल डॉ. एस. ए. धांडे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.  

या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रंथालय विभागाच्या वतीने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या वाचन व अभ्यासाची आवड वाढण्यास मदत होत आहे.  

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रंथालय समिती, विद्यार्थी व सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा उपक्रमांचे स्वागत केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार