नेमकं काय आहे प्रकरण?

 आ.धस ज्याला म्हणतात, तुला ९९ टक्के नाही तर १०० टक्के माझा आशिर्वाद आहे....


राज्यात गाजत असलेला सुरेश धसांचा निकटवर्तीय
'खोक्या' नेमका आहे कोण?


     बीडमधील शिरूर तालुक्यातील एका गरीब व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले ने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली असून तो भाजप आमदार सुरेश धस  यांचा निकटवर्तीय आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सतीश भोसले यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला होता. यानंतर सतीश भोसलेचा दुसरा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात तो नोटांचे बंडलं गाडीच्या डॅशबोर्डवर टाकताना दिसत आहे. आता सतीश भोसलेचा तिसरा व्हिडिओ व्हायरल होत असून तो थेट हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतीश भोसलेकडे इतका पैसा आला कुठून? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता सतीश भोसले कोण आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. 
              एकीकडे संतोष देशमुख देशमुख यांच्या हत्येने वातावरण ढवळून निघालेले असतानाच बीडच्या शिरुरमध्ये एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या असे या मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव असून त्याचे आणखीही काही व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसलेचे नवनवे कारनामे आता समोर येत आहे. एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी सतीश भोसलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता त्याचा हेलिकॉप्टरने एन्ट्री केल्याचा तसेच नोटांचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतानाचेही व्हिडिओ समोर आलेत. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थाटात मिरवणारा, हॅलिकॉप्टरने एन्ट्री घेणारा तसेच नोटांचे बंडल उधळणारा हा तरुण आहे कोण? त्याच्याकडे इतके पैसे आले कुठून? असा सवाल उपस्थित होत असून यावरुनच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आक्रमक भूमिका घेत सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. सतीश भोसले हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. 
    नेमका कोण आहे सतीश भोसले?
 सतीश भोसले हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारात सक्रिय असून भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सतीश भोसलेने सामाजिक कार्यातून तसेच पारधी समाजासाठी केलेल्या कार्यातून ओळख निर्माण केली.तसेच याआधीही सतीश भोसले वर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. अलिकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला. अशातच गेल्या 24 तासात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची सर्वत्र चर्चा होत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले  याने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला मारहाण केली आहे. यावरून अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करत हे काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावरून सुरेश धस यांनी हो, सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्टीकरण दिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार