रामकृष्ण बांगर यांच्याकडून ईफ्तार पार्टी
अमोल जोशी/पाटोदा....
पाटोदा येथे दरवर्षीप्रमाणे गेल्या 29 वर्षापासून सतत सहकार महर्षी रामकृष्ण बांगर वतीने पाटोदा शहरातील तमाम मुस्लिम बांधवांसाठी रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन दर्गावली मज्जिद राजमहंमद चौक येथे करण्यात आले होते . यावेळी हिंदू मुस्लिम बांधव यांची उपस्थिती जास्त प्रमाणात होती. यातूनच सामाजिक ऐक्य हे पाटोदा शहरातून सिद्ध आहे. . यावेळी रामकृष्ण बांगर यांनी सर्व मुस्लिम बांधवाला रमजानच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटोदा तालुक्यातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा