बालविवाह अंगलट आला !
१५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून तिघा विरूद्ध गुन्हा दाखल
तर मुलीची आई म्हणते मुलीला फुस लावून पळवून नेले !
मुलीची आई, नवरा आणि अन्य एका विरुद्ध बलात्कार, पोक्सो, बालविवाह आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल !
केज :- १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा तिची आईने व आईच्या संपर्कात असलेल्या एका व्यक्तीने तिचे परजातीच्या युवकांशी बळजबरीने लग्न लावून दिले. अशा आशयाची अल्पवयीन मुलीने केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून मुलीची आई, तरुण आणि अन्य एका विरुद्ध बलात्कार, पोक्सो, बालविवाह आणि ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न तिची आई आणि आई सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेल्या विलास पांढरे नावाच्या व्यक्तीने, केज तालुक्यातील साळेगाव येथील परजातीच्या तरुणा सोबत लग्न लावून दिले. अशा आशयाची तक्रार सदर मुलीने दि. २८ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्या नुसार त्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून तिचा नवरा बालाजी शाहू लांडगे, तिची आई आणि तिच्या आईचे ज्याच्याशी घरोबा आहे, त्या विलास पांढरे याच्या विरूद्ध गु. र. नं. १२३/२०२५ भा. न्या. सं. ६५ (१), बालकांचे लैंगिक शोषणा पासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, ६, ८, १२, १७ (३) यासह बालविवाह प्रतिबंधक कायदा कलम ९, १०, ११ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ३ (२) (व्ही), ३ (१) (डब्ल्यू) (i) (ii) नुसार बलात्कार, बालविवाह, पोक्सो आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलीची आई काय म्हणते
सदर अल्पवयीन मुलीची आई आणि ती ज्यांच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते त्या विकास पांढरे हें पैठण येथे मेस चालवीत असून बालाजी लांडगे हा कंपनीत काम करीत असताना त्यांच्या मेसवर जेवायला जात असल्याने त्याची मुलीची ओळख झाली. त्यातून त्याने.तिला फुस लावून पळवून आणले. अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी दि. २७ मार्च रोजी मुलीची आई, विलास पांढरे आणि तिचे दोन अल्पवयीन भावंडे हे लांडगे यांच्या शेतात मुलीचा शोध घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना त्या मुलाचे नातेवाईक यांनी मारहाण केली. त्यामुळे ते सर्वजण भीतीने रात्री चिंचोली माळी पाटी जवळ अंधारात लपून बसले. त्यांनी मदतीसाठी पोलिसांना ११२ क्रमांकावर संपर्क साधला. त्या नंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव मांजरमे, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंभुदेव दराडे यांनी घटना स्थळी हजर होत त्यांची व त्या अल्पवयीन मुलीची सुटका करून त्यां सर्वांना केज येथे घेवून आले.
तिघेही वेगवेगळ्या जातींचे
मुलगी आणि तिची आई हे अनुसूचित जातीची आहे. तर त्या महिले सोबत असलेला व्यक्ती हा धनगर या ओबीसी प्रवर्गातील असून सदर मुलीला पळवून आणणारा आणि फिर्यादी नुसार तिचे ज्याच्याशी लग्न लावले तो युवक बालाजी लांडगे हा मराठा जातीचा आहे.
________________________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा