हल्लेखोरांचा केला सिनेमा स्टाईलने पाठलाग
कोयता गँगचे सात जण घेतले ताब्यात !
खुनी हल्ला करून मोटार सायकलवरून पळून जाणाऱ्या हल्लेखोरांचा केला सिनेमा स्टाईलने पाठलाग
केज :- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून मोटार सायकली वरून पळून जात असलेले कोयता गँगचे सात हल्लेखोर सिने स्टाईल पाठलाग करून केज पोलिसांनी मस्साजोग जवळ ताब्यात घेतले आहेत.
या बाबतची माहिती परभणी जिह्यातील गंगाखेड मधील शिवाजी नगर येथील सौरभ श्रीराम राठोड हा १७ वर्षाचा युवक शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील कारेगाव ता. शिरूर येथे वास्तव्यास असून तो शिक्षण आहे. २३ मार्च रोजी रात्री ९:०० वा.च्या सुमारास त्याचे मित्र यश धनवटे, आदित्य शिंदे, अक्षय युके, अवनिश प्रजापती हे हॉटेलमध्ये जेवण करून येत असताना त्यांना सौरभ राठोड याचे काही मुला सोबत किरकोळ कारणा वरून भांडण झाले. त्या नंतर ओंकार देशमुख याचे साथीदार सौरभ राठोड यास म्हणालेंकी, तु ओंकार देशमुख यास खुन्नस देवुन का बघितले ? तुला माहीत आहे का ओंकार देशमुख कोण आहे ? थांब तुला जिवंतच सोडत नाही. असे म्हणत गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण रोहन गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरूर) व दोन अनोळखी मित्रांनी कोयत्याने पोटात व पाठीवर वार करीत दगडाने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तर सोडविण्यास गेलेल्या यश राजू धनवटे यास हाताने व लाथा बुक्यांनी मारून दमदाटी केली. सौरभ राठोड याच्यावर उपचार सुरू असून यश धनवटे याच्या फिर्यादी वरून वरील सात जणांसह अनोळखी दोघां विरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास करीत होते.
असे घेतले कोयता गँगला ताब्यात
रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, पोलीस नाईक गोरख फड, पोलीस नाईक चंद्रकांत काळ कुटे, बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे हे मस्साजोग येथील पेट्रोल पंपा जवळ सापळा लावून डबा धरून बसले होते. सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना तीन मोटार सायकलवर ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि एकजण असे
सातजण येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच ते हल्लेखोर मोटार सायकली सोडून शेतात पळून जावू लागले. त्या नंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
कोयता गँगवर गंभीर गुन्हे दाखल
रांजणगाव पोलीस ठाण्यात ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि इत्तर दोघे यांच्या विरुद्ध गु र नं ९०/२०२५ भा न्या सं.१०९(१),१८९(२), १९१(२) १९१(३), १९०, ३५२, ३५१(२) अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.
कोयता गँगच्या तीन मोटार सायकली केज पोलिसांनी दिल्या रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात
सौरभ श्रीराम राठोड वय (१७ वर्ष) आणि त्याचा मित्र यश धनवटे यांच्यावर कोयत्याने जीवघेणा खुनी हल्ला करून मोटार सायकली वरून पळून जात असलेले कोयता गँगच्या सात हल्लेखोरांना केज पोलिसांनी मस्सा जोग जवळील पेट्रोल पंपाजवळ सिने स्टाईल पाठलाग करून त्यांच्या तीन मोटार सायकली ताब्यात घेतल्या होत्या. ते सर्व आरोपी आणि मोटार सायकली रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधून कळविले होते. माहिती मिळताच दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, पोलीस नाईक गोरख फड, पोलीस नाईक चंद्रकांत काळ कुटे, बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे हे मस्साजोग येथील पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून दबा धरून बसले होते. सायंकाळी ५:३० वा. च्या सुमारास त्यांना तीन मोटार सायकलवर ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि एकजण असे.सातजण येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच ते हल्लेखोर मोटार सायकली सोडून शेतात पळून जावू लागले. त्या नंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्या सात जनांसह तीन मोटार सायकली ताब्यात घेतल्या. त्या नंतर रांजणगाव पोलिसांशी संपर्क साधून दि. २५ मार्च रोजी आरोपी आणि त्यांच्या मोटार सायकली रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिल्या
सौरभ राठोडला रुबी हॉलला हलविले
कोयता गँगच्या खुनी हल्ल्यात गंभीर जखमी असलेला सौरभ राठोड याला कारेगाव येथील कोहकडे हॉस्पिटल मध्ये प्रथमोपचार करून नंतर शिरूर येथे वेदांता हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. त्या नंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुणे येथील रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रांजणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी प्रतिनिधीशी फोनवर बोलताना दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा