वैद्यनाथ कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यतिथी साजरी
परळी प्रतिनिधी......
जवाहर शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. जात आणि भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशवपन थांबवण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक लेखिका देखील होत्या. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ अर्चना चाव्हण यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा