भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती: पंचशील नगर कार्यकारणी जाहीर
अध्यक्षपदी प्रा.विजय मुंडे तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे व बंटी क्षीरसागर यांची एकमताने निवड
परळी /प्रतिनिधी दि...11मार्च
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीची कार्यकारणी पंचशील नगर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली या बैठकीत एक मताने जयंती उत्सवाचे अध्यक्ष म्हणून परळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती प्रा.विजय मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण घाडगे व बंटी क्षीरसागर यांची निवड करण्यात करण्यात आली.
पंचशील नगर येथील बौद्ध विहारात मिलिंद क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राजन वाघमारे,जि.प.सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ),युवा नेते राहुल कराड, कैलास डुमणे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यात आली सचिवपदी बंटी आचार्य, तर कोषाध्यक्षपदी अण्णासाहेब सरवदे, संरक्षण प्रमुख पदी अक्षय ढगे, किरण जगताप मिरवणूक प्रमुखपदी अनिल सरवदे, सचिन सरवदे तसेच जयंती उत्सव समितीचे सदस्य म्हणून विजय सरवदे, विजय लांडगे, अविनाश गोडे, सुलोचनाताई बुक्कतर रवींद्र सरवदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पंचशील नगर येथील बौद्ध उपासक व उपाशीका नागरिक, युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा