समस्त शिक्षक वर्गाला सविनय समर्पित...
गुरूजीला न्यायला आलेला!यम सुध्दा रिकामा परत गेला ...!
काल आमच्या शाळेत वेगळंच काही प्रकरण घडलं,!
*गुरुजींना न्यायला देवानं यमाला अर्जंट धाडलं !!*
*न विचारताच यम घुसला डायरेक्ट गुरुजींच्या वर्गात,!*
*चला गुरुजी आपल्याला जायचं आहे स्वर्गात.!!*
*एका मिनीटात तुम्हाला येणार आहे अटॅक,!*
*तुमचा जीव माझ्या मुठीत येईल मग फटॅक.!!*
*यमाचं बोलणं ऐकूण गुरुजी लागले रडू,!*
*खूप दिवसांनी घेतलाय रे यमा हाती खडू.!!*
*फक्त एक कविता दाखवतो त्यांना गाऊन,!*
*मग जा खुशाल तू माझे प्राण घेऊन.!!*
*ठीक आहे म्हणत यम वर्गाबाहेर बसला,!*
*गुरुजींचा डान्स पाहून तो ही फार हसला.!!*
*यमालाही आठवलं त्याचं बालपण,!*
*दाटून आला गळा त्याचा गहिवरलं मन.!!*
*आजच्या दिवस एक्स्ट्राचा घ्या म्हणला जगून,!*
*उद्या येतो म्हणत यम गेला आल्या पावली निघून.!!*
*दुसऱ्या दिवशी सकाळीच यम झाला हजर,!*
*गुरुजींचीही पडली त्याच्यावरती नजर.!!*
*काहीही म्हण यमा अर्जंट आहे काम,!*
*केंद्रावर जाऊन येतो तोवर जरा थांब.!!*
*सर्वेक्षणाची फाईल साहेबांस येतो देऊन,!*
*किरकोळ रजेचा अर्जही येतो जरा ठेवून.!!*
*करायच्या आहेत अजून तांदळाच्या प्रती,!*
*पोरांची बी काढायची आहेत बँकेमधे खाती.!!*
*आकारिकचं काम पण घेतलंय काल हाती,!*
*डोक्यामध्ये नुसती गणगण काय आणि किती?!!*
*शेवटचे हे आठ दिवस थांब यमा मित्रा,!*
*तोवर माझ्या मिटवतो भानगडी ह्या सतरा.!!*
*शेवटची ही संधी गुरुजी आज नक्की देईन,!!*
*पुढच्या सोमवारी प्राण घ्यायला मी पुन्हा येईन.!!*
*गुरुजींच्या डोक्याला आलं कुटुंबाचं टेन्शन,!*
*आपण गेलो तर काय होईल आपल्याला नाही पेंशन.!!*
*म्हणता म्हणता उगवला शेवटचा तो सोमवार,!*
*शाळेकडे गुरुजी झाले स्कुटरवरती स्वार.!!*
*तेवढ्यात गुरुजींच्या आलं काहितरी ध्यानात,!*
*गुरुजी थेट घुसले एका कपड्यांच्या दुकानात.!!*
*यम म्हणाला गुरुजी आज इकडं कसं काय?!*
*तेवढ्यात गुरुजींनी धरले यमाचे ते पाय.!!*
*गणवेषाचं तेवढं लावू दे आज मार्गी,!*
*आजच्या दिवस थांब उद्या जाऊ आपण स्वर्गी.!!*
*काय राव गुरुजी तुम्ही रोजच आहे बिझी,!*
*तुमच्या अशा वागण्यानं, डयुटी धोक्यात येईन ना माझी.!!*
*आजच्या दिवस यमा घे रे गड्या समजून,!*
*किर्द, दुरुस्ती दाखल्याचेही काम आहे पडून.!!*
*उदया पासून सुरु आहे CO साहेबांचा दौरा,!*
*कामाभोवती फिरतोय बघ गुरुजी नावाचा भोवरा.!!*
*परवा पासून खेळायची आहे टॅग ची पण इनिंग,!*
*पुढच्या आठवड्यात घ्यायचं आहे गणित पेटीचं ट्रेनिंग.!!*
*नंतर करायची आहे स्कॉलरशिपची तयारी,!*
*लसीकरणाची ही पार पाडायची आहे जबाबदारी.!!*
*पोरांच्या परीक्षा मग तपासायचे पेपर,!*
*नवोदय मधे पोरं करायची आहेत टॉपर.!!*
*कामाच्या या तानाची डोक्यात भेळ,!*
*आमच्याकडं नाही यमा मरायलाही वेळ..!!*
*खूप वाटतं फुलवावा ज्ञानाचा हा मळा,!*
*कांदा मुळा भाजी आणि आमचा मात्र खडू आणि फळा.!!*
*पोरांमधे जीव ओतून करतो आम्ही काम,!*
*त्यांच्या मधेच दिसतो रहिम अन त्यांच्या मधेच दिसतो राम.!!*
*फुकट पगार म्हणणार्यांची वाटते भारी कीव,!*
*हरकत नाही आज माझा घेऊन टाक तू जीव.!!*
*यमाला आलं गलबलून, ते सारं काही ऐकून,!*
*तुम्हाला न्यायला गुरुजी आता येणार नाही कधीच चुकून.!!*
*वाटेल तेव्हा या गुरुजी उघडेन स्वर्गाचं दार,!*
*सुंदर करा भारत आणि पोरं करा हुशार.*
*टाटा बाय बाय करत करत यम गेला निघून,!*
*परत येण्याआधी तो, घ्या ना छान जगून.!!*
*जगणं मरणं म्हणजे नाही काही वेगळं,!*
*नरक आणि स्वर्ग तर इथेच आहे सगळं.!!*
*कामाशी काम करून घडवा नवा भारत,!*
*कामाशिवाय इथं कुणीच अमर नाही ठरत...!!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा