आता परळीत रस्त्यावर, उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्यांची गय नाही !

नोटीसा बजावल्या आहेत; यापुढे कडक कायदेशीर कारवाई करणार-  न.प. मुख्याधिकाऱ्यांचा गंभीर इशारा 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

      परळीतील रस्त्या- रस्त्यांवर उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या लोकांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यावर व उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असुन यापुढे उघड्यावरील मांस विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरपरिषद मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी दिला आहे.

        गेल्या सहा दिवसापासून परळी शहरातील तीन गोरक्षकांनी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. हे आमरण उपोषण करताना सहा वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी वैजनाथ येथे मुख्य रस्त्यांवर उघड्यावरच मांस विक्री केली जाते. यावर निर्बंध असावेत अशा प्रकारची प्रमुख मागणीही करण्यात आली होती. या अनुषंगाने आज या उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासनाचे पत्र देताना मुख्याधिकाऱ्यांनी या मुद्याबाबतही अतिशय स्पष्टपणाने स्पष्टीकरण दिले आहे. उपोषणकर्त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने परळी शहरातील उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना नगरपरिषदेने नोटीसा बजावल्याचे सांगण्यात आले. यापुढे रस्त्यावरील, उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाया करण्यात येणार आहेत. याबाबत प्रशासन सहजतेने घेणार नसुन अतिशय गांभीर्याने या बाबीकडे बघितले जाईल. तसेच उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे परळी नगरपरिषद मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे यांनी म्हटले आहे.


नगर परिषद मुख्याधिकाऱ्यानी काय दिले लेखी अश्वासन?....

१. परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मांस विक्री बंद करणे बाबत या कार्यालयामार्फत स्थानिक वृत्तपत्रात जाहिर आवाहन प्रसिध्द करण्यात आले आहे.


2. परळी शहरातील कत्तलखाना बंद असलेले वावत पत्र देवून आपणास कळविण्यात आले आहे.


3. परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मांस विक्री बंद करणे बाबत ध्वनीक्षेपणाद्वारे सुचना देण्यात आलेल्या आहेत.


4. परळी शहरातील मुख्य रस्त्यावरील व उघड्यावरील मांस विक्री करणा-यांना नोटीस तामिल करण्यात आलेल्या आहेत.


5. परळी शहरातील कत्तलखाना आज दिनांक 08.03.2025 रोजी लोखंडी पत्र्यांनी बंद करण्यात येईल. जेणे करून त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. तथापि सदरील कत्तलखाना पाडण्यात यावा किवा कसे याबाबतचा स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट मागविण्यात येत असून या कार्यालयास साधारणतः दिनांक 12.03.2025 रोजी पर्यंत स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट प्राप्त होईल स्ट्रक्चरल ऑडीट रिपोर्ट नुसार कार्यवाही करण्यात येईल.


● संपूर्ण video पहा:-

https://www.youtube.com/live/fH8U68BxoF4?si=xVu57PxMUBZfFRa

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार