जागतिक महिला दिना निमित्त आरती सोनेसांगवीकर आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित
अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)
अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने "जागतिक महिला दिन" साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती अंजली कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून विधिज्ञ ऍड.कल्याणी विर्धे,सुजाता धर्माधिकारी,दत्त संगीत विद्यालयाच्या संचालिका लता पत्की,सेवानिवृत्त प्राचार्य दिलीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
अ.भा.पे.संघटना बीड शाखाध्यक्षा आरती मिलिंद सोनेसांगवीकर यांना या वर्षीचा "आदर्श महिला पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले.
महिला दिना निमित्याने घेण्यात आलेल्या प्रश्न मंजुषा व अंताक्षरी स्पर्धेतील शिल्पा सेलुकर,प्रभावती राडीकर, अंजली देवगावकर,अमृता चिक्षे, यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात आले. उज्वला कुलकर्णी यांच्या जन्मदिना निमित्ताने शुभेच्छा देण्यातआल्या. अखिल भारतीय पेशवा संघटनेचे पदाधिकारी संजय कार्याध्यक्ष सुधीर धर्माधिकारी, सरचिटणीस मिलिंद कुलकर्णी,सोनेसांगवीकर,उपाध्यक्ष अभय जोशी,कोषाध्यक्ष भास्कर देशपांडे, उद्योजक विवेक वालेकर,सविता देशमुख आदीसह तालुका व शहर कार्यकारिणी पदाधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा