विशाल मुंडे या तरुणाचा  विजेचा शॉक लागून मृत्यू 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील इंद्रपवाडी येथील विशाल परमेश्वर मुंडे (२४) या युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. दि. ०६ मार्च रोजी ही घटना घडली आहे. 

         परळी तालुक्यातील येथील इंद्रपवाडी येथील चेअरमन रामभाऊ सिताराम मुंडे यांचे नातू विशाल परमेश्वर मुंडे (२४) यांचा टेबल फॅन ला विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. विशाल अतिशय चांगला मुलगा व मनमिळाऊ स्वभावाचा होता. आणि त्याच्या पश्चात आजोबा चुलते  आई-वडील बहीण अनेक भावंड असा भरगच्च परिवारावर आहे.या परिवारावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. 


 राख सावडण्याचा विधी

     विशाल परमेश्वर मुंडे यांचा राख सावडण्याचा विधी रविवार दिनांक 9 मार्च रोजी सकाळी सात वाजता परळी तालुक्यातील इंदपवाडी येथे होणार असल्याचे मुंडे कुटुंबियांकडून कळवण्यात आले आहे. मुंडे परिवाराच्या दुःखात दैनिक..... परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !