वसंतदादा पाटील महाविद्यालयात शहीद दिन  साजरा

अमोल जोशी / पाटोदा - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शहीद दिन  साजरा करण्यात आला.


प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रोफेसर सतिश माउलगे होते. त्यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, शहीद राजगुरू व शहीद सुखदेव यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पमाल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग संचालक प्रोफेसर गणेश पाचकोरे, कमवि उपप्राचार्य प्रा. नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड, कर्मचारी कल्याण सचिव प्रा. शरद पवार, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. मनिषा गाढवे,  प्रोफेसर महादेव काळे, प्रा. अशोक दहिफळे, डॉ. उमाकांत वानखेडे, डॉ. शकुंतला बडे आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. शरद पवार यांनी केले. आभार प्रो. महादेव काळे यांनी मानले.  अभिवादन कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !