परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

संपूर्ण मुंडे कुटुंब धनंजय मुंडे यांच्या पाठीशी - बंधू अजय मुंडे

संपूर्ण मुंडे कुटुंब धनंजय मुंडे यांच्या पाठीशी - बंधू अजय मुंडे

कौटुंबिक विषयात चुकीचे आरोप करून आम्हाला बदनाम करण्याचे षडयंत्र - अजय मुंडे यांची स्पष्टोक्ती


आ.सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबात नाराजी असल्याच्या केलेल्या वक्तव्याचे बंधू अजय मुंडे यांच्याकडून खंडन


बीड (प्रतिनिधी) - आमचे बंधू तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथील पंढरी निवासस्थानाचे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले असल्याने मागील काही महिन्यांपासून ते आमच्या नाथ्रा या जन्मगावी असलेल्या घरी राहण्यासाठी आई व कुटुंबासह स्थलांतरित झालेले असून, हे सर्वांनाच माहित आहे. मात्र तरीही आता कोणत्याही आरोप करायला शिल्लक राहिलेले नसल्यामुळे आमदार सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबात नाराजी आहे धनु भाऊंच्या आई नाराज होऊन गावी गेल्या, त्यांचे भाऊ नाराज आहेत, अशा प्रकारच्या वल्गना करत धादांत खोटे व निराधार आरोप केले असून, संपूर्ण मुंडे कुटुंब हे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राजकारणामध्ये एखाद्या व्यक्तीला केवळ बदनाम करण्यासाठी आज पर्यंत कुटुंबापर्यंत कधीही कोणीही आरोप केलेले नाहीत असे वक्तव्य, धनंजय मुंडे यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे माजी गटनेते अजय मुंडे यांनी केले आहे. 


एका कार्यक्रमानिमित्त बीड येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमच्या कुटुंबात धनु भाऊ व पंकजाताई असे दोघेजण एकाच वेळी मंत्री झाल्याचे अनेक जणांना कदाचित आवडले नसावे, त्यामुळे एका पाठ एक खोटेनाटे आरोप करून सातत्याने आमच्या कुटुंबाला बदनाम करून आता शेवटी कुटुंबात फूट पाडायचे प्रयत्न केले जात असून ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचेही अजय मुंडे म्हणाले. 


स्व.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना त्या अमानवी कृत्याची शिक्षा झालीच पाहिजे, मुंडे कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीने कधीही आरोपींचे समर्थन केले नाही. मात्र त्या आडून सातत्याने खोटे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे, असेही ते पुढे बोलताना म्हणाले.

       दरम्यान आ सुरेश धस यांनी मुंडे कुटुंबात नाराजी असल्याचे जे वक्तव्य केले त्या सर्व आरोपांचे अजय मुंडे यांनी खंडन केले आहे. यावेळी त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, प्रा. गणेश तांदळे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!