पुरुषांची नकारात्मक मानसिकता बदलणे गरजेचे - वसिमा शेख

अमोल जोशी / पाटोदा - आज प्रत्येक क्षेत्र महिलांनी पादाक्रांत करून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. अधिकाधिक महिला आर्थिकदृष्टया सक्षम होत आहेत तरीही एक गृहिणी असो किंवा उच्चपदस्थ अधिकारी असो, महिलेच्या मनाचा अनादर केला जातो. घरात व घराबाहेरही महिलेच्या इच्छा आकांक्षांना डावलले जाते. तिच्या निर्णयांना पारिवारिक निर्णय प्रक्रियेत महत्व दिले जात नाही. स्त्रिला  भावनिक आधार देऊन तिच्या प्रगतीसाठी आवश्यक सहकार्य केल्यास तिचा आत्मविश्वास वाढतो. पुरुषप्रधान संस्कृतीत जोवर पुरुषाची साथ महिलेला मिळत नाही तोपर्यंत ती खऱ्या अर्थाने यशस्वी होणार नाही, म्हणून स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी पुरुषांची महिलांबद्दल असलेली पराकोटीची नकारात्मक मानसिकता आधी बदलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पाटोद्याच्या उपविभागीय दंडाधिकारी वसिमा शेख मॅडम यांनी केले. येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.


महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण समिती व अंतर्गत तक्रार निवारण कक्षाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. व्यासपीठावर दुसऱ्या प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कोमल राख, महिला सक्षमीकरण समिती अध्यक्ष प्रा. मनिषा गाढवे, प्रोफेसर अनिता धारासूरकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. केशरबाई क्षीरसागर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पमाल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी सर्व प्राध्यापिका व उपस्थित विद्यार्थिनीचा अतिथींच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. कोमल राख यांनी सर्व कर्तृत्ववान महिलांना वंदन करून महिलेचा जीवनपट स्पष्ट करणारी व तिचे योगदान सिद्ध करणारी 'ती मला म्हणते मी होऊन बघ' ही प्रेरणादायी कविता सादर केली.


अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे म्हणाले की, समाजव्यवस्था परिवर्तनशील असते. सर्वांनी प्रथम आपल्या परिवारात स्त्रीला सन्मान देऊन प्रोत्साहन दिले तरच समाजव्यवस्था बदलेल.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनिषा गाढवे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ लांडगे यांनी केले. आभारप्रदर्शन प्रो. अनिता धारासूरकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार