इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये  जागतिक विज्ञान दिनाचे औचित्य साधून भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

 परळी(प्रतिनीधी): दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी प्रशालेतील प्राचार्य, विद्यार्थी, पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत विज्ञान दिवस व सी.व्हि. रमण यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

        कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून  करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीकांत पाटील सर व प्रमुख  पाहुणे व परीक्षक म्हणून लाभलेले लक्ष्मीबाई महिला महाविद्यालयाचे प्रा. अशोक पवार सर आणि प्रा.सौ.विना भांगे मॅडम व कु. वेदांचे पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच उद्घाटन  करण्यात आले.

 यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण यामध्ये प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या प्रतिकृती , चित्रफिती, चित्र इत्यादी प्रकल्पांचा समावेश होता.

या सर्व प्रकल्पातून विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिकतेची चुणूक दाखवत उत्तम प्रकारे प्रकल्पांचे स्पष्टीकरण ही केले. या प्रदर्शनीस  प्रेक्षक म्हणून प्रमुख पाहुणे तसेच पालकांचे योगदान लाभले.यामध्ये इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 

दरवर्षी विज्ञान प्रदर्शनी भरवण्यामागे विद्यार्थ्यांच्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजन करण्यात येते.  याप्रसंगी सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती होते.तसेच  प्रशालेचे मुख्याध्यापकांनी  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

  याप्रसंगी विवेकानंद युथ वेलफेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम  यांनी विज्ञान दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच प्रशालेचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक मा. श्री. किरण गित्ते साहेब (सचिव,नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, उद्योग  आरोग्य,पर्यटन विभाग त्रिपुरा सरकार) प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.श्रीकांत पाटील यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना विज्ञान दिनानिमित्तनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधनात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.विज्ञान दिनाची सांगता  विद्यार्थी संशोधकांनी अत्यंत उत्साहात व आनंदात केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!