भाजप नेते किरीट सोमैय्या यांची भेट घेत आश्रमशाळा शिक्षकांनी मांडली आपली कैफियत !
शंभर टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी तीन दिवसांपासून उपोषण सुरु
बीड, प्रतिनिधी:-
राज्यातील फुले, शाहू, आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना व्हीजेएनटी संहितेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करून शंभर टक्के अनुदान तात्काळ देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी तीन दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाहू फुलेआंबेडकर अनुसूचित जाती आश्रमशाळा शिक्षक कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्याच्या वतीने आमरण उपोषण सुरु केलेले आहे. आज भाजप नेते किरीट सोमैय्या हे बीड येथे आले असतांना त्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन देत आश्रमशाळा शिक्षकांनी आपली कैफियत मांडली.
शाहू, फुले, आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आमरण उपोषणास बसले आहेत. या उपोषणास्थळी राज्यभरातून शेकडो शिक्षक कर्मचारी दाखल होत आहेत.स्व. धनंजय अभिमान नागरगोजे यांच्या कुटुंबास ५० लक्ष रुपये तात्काळ मदत देण्यात यावी,त्यांच्या पत्नी राजकन्या धनंजय नागरगोजे यांना शासकीय सेवेत घेण्यात यावे व राज्यातील शाहू फुले आंबेडकर निवासी अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना व्हीजेएनटी संहितेनुसार वेतनश्रेणी प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. यासह अन्य मागण्यासाठी हे आमरण उपोषण केले जात आहे. या आमरण उपोषणात राज्यातील शेकडो शिक्षकांसह कर्मचारी सहभाग घेत आहेत. आज भाजप नेते किरीट सोमैय्या हे बीड येथे आले असतांना त्यांची भेट घेत आश्रमशाळा शिक्षकांनी मागण्यांचे निवेदन सादर करून आपली कैफियत मांडली.निवेदन स्वीकारून याबाबत लक्ष घालण्याचा सकारात्मक प्रतिसाद किरीट सोमैय्या यांनी शिष्टमंडळाला दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा