आवादाचे केबल कट......!
चोरट्यांनी आवादा एनर्जीच्या स्टोअर मधून पाच लाख रु. च्या केबलची चोरी !
केज :- संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाशी संबंधित असलेले खंडणी प्रकरण आणि हत्या यामुळे चर्चेत असलेल्या आवादा एनर्जी या पवन चक्की उभारणाऱ्या कंपनीच्या मस्साजोग येथील स्टोअर मधून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख रु किंमतीचे केबल वायर कापून नेले आहे.
या बाबतची माहिती अशी की, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे खंडणी प्रकरणाशी निगडीत असल्याने चर्चेत आलेल्या आवादा एनर्जी या पवन चक्कीचे केज-बीड महामार्गावर असलेल्या मस्साजोग येथे कंपनीचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या प्रांगणात पवनचक्की उभारणीसाठी लागणारे साहित्य ठेवलेले आहे. ११ मार्च रोजी कंपनीचे इंजिनियर रमेश कुमार सैनी हे सर्व साहित्य चेकिंग करीत असताना त्या साहित्य पैकी तेथे ठेवलेले कॉपर वायर गुंडाळलेल्या दोन नेसलचे वायर कापून चोरून नेल्याची निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या कॉपर वायरची किंमत ५ लाख ६ हजार रु एवढी आहे.
या चोरीची माहिती कंपनीचे असीस्टंट सिद्धेश्वर कलम यांनी कंपनीचे असिस्टंट मॅनेजर आशुतोष सिंह यांना दिली.
त्या नुसार दि.१८ मार्च रोजी असिस्टंट मॅनेजर आशुतोष सिंह यांच्या तक्रारी वरून के ज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. ११०/२०२५ भा. न्या. सं. ३३४(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश जोगदंड हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा