परळीतील गवते कुटुंब रमते कामात..... गुढी पाडव्याच्या साखरेच्या गाठी बनवण्यात हातखंडा!
मराठी नववर्षाची तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे. घरोघरी गुढी उभारून हा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी साखरेच्या गाठीनाही तेवढेच महत्त्व असते.
नाथ चित्रमंदिर पाठीमागे असणाऱ्या कल्याणकारी हनुमान मंदिराजवळ राहणारे श्री मनोज गवते यांचे कुटुंबीय जवळपास एक महिना अगोदर पासून या गाठी तयार करण्यात गुंतलेले असतात. त्यांच्या कुटुंबातील लहानथोर सदस्य याकामी सहभागी झालेले असतात. हे काम कौशल्याचे आणि नेहमीपेक्षा अधिक कष्टाचे असते. कधी पहाटेपासून तर कधी रात्री उशिरापर्यंत त्यांचे काम सुरु राहते. आपल्या आई वडिलांच्या हाताखाली काम करत करत त्यांनी हे कौशल्य वृद्धिंगत केले आहे. अजूनही त्यांच्या आईचे मार्गदर्शन मिळत आहे आणि पुढील पिढीत ते देण्यासाठी शाळेत उत्तम शिक्षण घेणारी त्यांची मुलेमुली याकामी सहभागी होत असतात.
अथक परिश्रमातून तयार झालेल्या या साखरेच्या गाठी आता बाजारात विक्रीसाठी तयार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा