"तात्यायन"ला पुरस्कार


परळी वैजनाथ, प्रतिनिधी - "लोकसत्ता"च्या छत्रपती संभाजीनगर आवृत्तीतील वरिष्ठ प्रतिनिधी बिपीन देशपांडे यांनी वडिलांवर लिहिलेल्या "तात्यायन-एक सिद्धांत" या चरित्र ग्रंथाला पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने देण्यात येणारा २०२५ चा महात्मा ज्योतिराव फुले साहित्य पुरस्कार (चरित्र ग्रंथ गट) जाहीर झाला आहे. विविध पुरस्कारांची निवड ही या संदर्भातील समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक तथा उदगीर येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. ऋषिकेश कांबळे व अन्य सदस्यांच्या विचारातून करण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष समाधान दहिवाळ यांनी दिली. पुरोगामी सामाजिक सांस्कृतिक महासंघाच्या वतीने लवकरच दुसरे परिवर्तनवादी साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत असून, त्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे, असे समाधान दहिवाळ यांनी कळवले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार