अमृताश्रमस्वामी महाराज यांना श्रीसंत नरहरिनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार जाहीर
बीड, प्रतिनिधी....
अमृताश्रम स्वामी महाराज जोशी यांना श्रीसंत नरहरीनाथ महाराज जीवन गौरव पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.
नवगण राजुरी बीडचे भूमिपुत्र, वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार, धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांना संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा श्रीसंत नरहरिनाथमहाराज जीवनगौरव पुरस्कार देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा या वर्षी शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराजांच्या पुण्यभूमी श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये वैदिक व वारकरी संप्रदायातील विद्वज्जन विभूतींच्या मंगल उपस्थितीत दि २१ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वा. श्री,प,पू मोहननाथ महाराज पैठणकर यांच्या हस्ते संत अमळनेरकर महाराज मठ श्रीक्षेत्र पैठण तेथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे.श्री जोशी महाराज यांना यापूर्वी समता रत्न पुरस्कार,बापू पुरस्कार,एकता पुरस्कार,वारकरी भूषण पुरस्कार,तथा महाराष्ट्र शासना चा कीर्तन प्रबोधन इत्यादी असे अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
अमृताश्रमस्वामी महाराज यांना प.पू. गुरुवर्य मोहननाथमहाराज पैठणकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्तिपरायण श्री. रावसाहेब महाराज गोसावी (संस्थानाधिपती, श्रीएकनाथमहाराज संस्थान, पैठण) राहणार आहेत.यावेळी परमपूज्य श्री. प्रसादमहाराज अमळनेरकर (श्रीक्षेत्र पंढरपूर), ह.भ.प.श्री. कान्होबामहाराज देहुकर (जगद्गुरु श्रीसंत तुकारामहाराजांचे वंशज, श्रीक्षेत्र पंढरपूर),ह.भ.प.श्री.राणामहाराज वासकर (वासकर फड, श्रीक्षेत्र पंढरपूर), ह.भ.प.श्री. महंत शिवाजीमहाराज (श्रीक्षेत्र नारायणगड), ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर (जळगांवकर फड, श्रीक्षेत्र पंढरपूर),ह.भ.प.श्री. प्रमोदमहाराज जगताप (बारामती), ह.भ.प.श्री. माधवदासमहाराज राठी (विश्वस्त - श्रीसंत निवृत्तीनाथमहाराज संस्थान, त्र्यंबकेश्वर), ह.भ.प.श्री.राममहाराज झिंजुकें (सदूरू जोगमहाराज संस्थान, अखेगाव),ह.भ.प.श्री. एकनाथमहाराज पुजारी (बीड),श्री. सुरज लोळगे (मा. नगराध्यक्ष - पैठण),श्री. विनीत सबनीस (श्रीमंत माऊली प्रतिष्ठान, मुंबई)श्री. भुषण कावसानकर (मा. नगरसेवक - पैठण) तथा वारकरी संप्रदायातील सर्व युवा कीर्तनकार, प्रवचनकार व गुणिजन गायक वादक वृंद या समारंभास उपस्थित असणार आहेत.
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या नाथ परंपरेच्या वतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा श्रीसंत नरहरिनाथ महाराज जीवनगौरव पुरस्कार या वर्षी शांतीब्रह्म श्रीएकनाथमहाराजांच्या पुण्यभूमी श्रीक्षेत्र पैठण नगरीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. भाविक सज्जनांनी या पुरस्कार प्रदान समारंभास उपस्थित असे आवाहन श्रीसंत नरहरिनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र देऊळगाव राजा जि. बुलढाणा यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा