इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

सुरेश धसांनी आरोप करतांना काढले कौटुंबिक विषय: धनंजय मुंडे उद्विग्न: धसांचा घेतला चांगलाच समाचार 

        सातत्याने धनंजय मुंडे यांना टार्गेट करून आरोप करणारे सुरेश धस यांनी आता पातळी सोडली असुन आरोप करतांना ते धनंजय मुंडे यांचे कुटुंब व परिवारजन इथपर्यंतही बेताल वक्तव्य करतांना दिसत आहेत.यावर आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले असुन त्यांनी फेसबुक व अन्य सोशल माध्यमातून पोस्ट करून सुरेश धस यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.

       शनिवारी एका वाहिनीवर बोलतांना सुरेश धस यांनी पुन्हा मुंडेंवर निशाणा साधला. 'धनंजय मुंडे हे वाल्मिक कराडच्या एवढे आहारी गेले होते की, त्यामुळे घरातील लोकसुद्धा त्यांच्यावर नाराज असतील, त्यांची आई तर गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या मुळ गावी नाथ्रा येथे गेल्या आहेत,' असे सुरेश धस म्हणाले. धसांच्या या विधानावर मुंडेंनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.धनंजय मुंडेंनी ट्विट करत धसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.धनंजय मुंडे म्हणाले, परळी वैजनाथ शहरातील पंढरी या माझ्या निवासस्थानाचे नूतनीकरणाचे काम हाती घ्यायचे असल्याने मी, माझी आई व कुटुंबीय मागील काही महिन्यांपासून आमच्या नाथ्रा या जन्म गावात असलेल्या शेतातील घरात स्थलांतरित झालो आहोत, तिथेच राहत आहोत. ही गोष्ट सर्वांनाच माहित आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनीच याआधी एका मुलाखतीत मी शेतातील घरात राहतो असे सांगितले होते. काल मात्र त्यांनी फक्त माझी आई राहते, असे सांगितले आणि खोटे नाटे आरोप केले. तर मुंडे असेही सुनावले की, 'माझे चुलत भाऊ हे प्रत्येक निर्णयात माझ्या सोबतीने भक्कमपणे उभे असतात, हेही सर्वांना माहित आहे, मात्र त्याबाबतीतही चुकीचे आरोप केले गेले आहेत.

धनंजय मुंडेंनी त्यांच्यावर सुरु असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. 'मागील काही महिन्यांपासून माझ्यावर सातत्याने आरोप केले जात आहेत. मात्र आता कदाचित आणखी काही खोटे आरोप करायला शिल्लक नसावेत म्हणून काहीजण माझ्या कुटुंबावर सुद्धा असे खोटारडे आरोप करून घृणास्पद राजकारण साधत आहेत, हे उद्विग्न करणारे आहे.' असे बोल मुंडेंनी लावले.'

'राजकीय आणि सामाजिक जीवनात अलीकडच्या काळात माझ्यावर या प्रकारचे खोटे आरोप आणि ड्रामा स्क्रिप्ट रचण्यात आल्या. माझ्या आजार आणि आरोग्यावर व्यंग आणि निंदा केली गेली, शंका निर्माण केल्या गेल्या, तेही सगळं मी सहन केलं. मात्र माझ्या जन्मदात्या आईवर असे खोटे आरोप करण्याची हिम्मत कुणी करत असेल, तर हे स्वीकारणे आणि गप्प राहणे अशक्य आहे.' अशा तीव्र शब्दांत त्यांनी धसांवर प्रहार केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!